औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगरमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट नोटा तयार करण्याच्या मशीनसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपीकडून १ लक्ष २० हजार रुपयांच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील गजबजलेल्या पुंडलिकनगरमध्ये हा बनावट नोटाचा (Fake notes) छापण्याचा कारखाना अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता या आरोपींनी किती नोटा चलनात आणल्यात, याचा शोध लावणं पोलिसांसमोर आव्हान आहे.
हे देखील पहा :
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील पुंडलिकनगरमध्ये बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून किसन रघुनाथ ढवळपुरे याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर हा बनावट नोटांचा कारखाना सापडला. पुंडलिक नगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आणि सध्या जामिनावर असलेला आरोपी समरान उर्फ लकी रशीद शेख आणि नितीन चौधरी हे दोघे मुकुंदवाडी येथे भाड्याने घेतलेल्या रूममध्ये बनावट नोटा तयार करीत होते. त्या बनावट नोटा अक्षय अण्णासाहेब पडूळ आणि दादाराव पोपटराव गावडे यांच्यामार्फत बाजारात चालवले जात होते.
औरंगाबाद शहर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता समरान उर्फ लकी रशीद शेख, नितीन कल्याणराव चौधरी, अक्षय अण्णासाहेब पडूळ, दादाराव पोपटराव गावडे आणि रघुनाथ चंदन दास ढवळपुरे याना पकडण्यात यश आले. त्यांच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपये दराच्या बनावट 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यासोबत बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कंप्यूटर, ऑल इन वन प्रिंटर कटर स्केल, कागद असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा लोगन कार आणि संपर्कासाठी वापरण्यात आलेले 5 मोबाईल असा एकूण 3 लाख 10 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.