दहशत माजवण्यासाठी हातात घेतली तलवार, पोलिसांना मिळाली खबर, अन्...

हातात तलवार घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
Aurangabad crime update
Aurangabad crime updatesaam tv
Published On

औरंगाबाद : हातात तलवार घेवून शहारात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणं (Sword) एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. शहरातील पंचायत समिती परिसरात एक तरुण तलवार घेऊन उभा असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना (Police) मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्या परिसरात धाव घेत तलवारबाज तरुणाच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद राफेउद्दीन (culprit arrested) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, तलवार घेवून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Aurangabad crime update
ST चालकाने मुलीचा मृतदेह नेला थेट आगारात; आगार प्रमुखावर केले गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात तलवार घेवून दहशत पसरवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबाद शहरातील पंचायत समिती परिसरात एक तरुण तलवारीनं नागरिकांना भयभीत करण्याच्या प्रयत्नात होता. मोहम्मद राफेउद्दीन असं त्या तरुणाचं नाव आहे. मात्र, या प्रकाराबाबत पोलिसांना खबर मिळताच मोहम्मदचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर मोहम्मदला पोलिसांनी अटक केली.

लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जीवघेण्या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तलवारीनं केक कापण्याचं फॅडही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा तरुणांना वचक बसवण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर पावलं उचलणं गरजेचे आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com