नातेवाईकांचा विरोध झुगारुन मुलीनं जन्मदात्यासाठी असं काही केलं, वाचून तुम्हीही भारावून जाल

जिवापाड जपणारे वडील काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा अनेक मुली अग्निडाग देतात. पण औरंगाबादमधील मुलीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
Aurangabad
AurangabadSaam TV
Published On

औरंगाबाद: जुन्या परंपरेने चालत आलेल्या रितीरिवाजानुसार वडिलांच्या निधनानंतर मुलानेच सर्व अंत्यविधी करण्याची पद्धत आहे. मात्र या परंपरेला छेद देत मुलांमुलींमध्ये भेद नाही आणि मुलांप्रमाणेच मुली देखील वडिलांचा अत्यंविधी पार पाडू शकतात याचं उदाहरण औरंगाबादमधून समोर आलं आहे.

औरंगाबाद (Aurangabad) शहरातील डॉ. योगिनी पांचाळ यांनी एखाद्या मुलाप्रमाणे वडिलांच्या निधनानंतर सर्व विधी निभावले. मुलाप्रमाणे मुलीने सर्वच विधी केल्या, विशेष म्हणजे पित्याला अग्निडाग दिल्यानंतर केशदानही डॉक्टर पांचाळ यांनी केलं आहे. वडील-मुलीच्या नात्याचा बंध निराळाच असतो.

पाहा व्हिडीओ -

जिवापाड जपणारे वडील काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा अनेक मुली अग्निडाग देतात. या घटना काही नवीन नाहीत. पण, एक पाऊल आणखी पुढे टाकत योगिनी पांचाळ यांनी एखाद्या मुलाप्रमाणे वडिलांच्या निधनानंतर सर्व विधी निभावले. एवढेच नाही तर मुलाप्रमाणेच दहाव्याला केशदानही केले. अग्निडाग देईपर्यंत कुणाचा काही आक्षेप नव्हता. पण, तो देतानाचे विधी आणि केशदानाला नातेवाइकांनी विरोध केला.

मात्र, योगिनी यांनी ठाम भूमिका घेतली. वडिलांच्या प्रेमाखातर मी विधी तर करीनच पण केसही देईल, असा निर्धार केला. स्त्री सौंदर्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक केस असतात. पण, वडिलांसाठी ते केशदान करणारच यावर ठाम राहिले.

Aurangabad
Sangli: मुलं चोरीच्या अफवेमुळे भंगार गोळा करण्यासाठी आलेल्या महिलेला झाडाला बांधून मारहाण

कोण काय म्हणेल याचा विचार करत बसलो तर क्रांती कशी होणार होणार? मुलगीही मुलाप्रमाणेच आहे तर मग तो केशदान करतो, मी का करू नये,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या वडिलांनी माझ्या पालनपोषणात मुलगा मुलगी भेद येऊच दिला नाही. मग, वडील जेव्हा मला मुलाप्रमाणे वाढवतात, तेव्हा मी देखील मुलगा असल्याचे कर्तव्य निभावले पाहिजे, असे डॉ. योगिनी पांचाळ यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com