औरंगाबादेत चाललंय काय ? व्हिडिओ रीलवरून झालेल्या वादातून तरुणांचा मैत्रिणीच्या आईवर जीवघेणा हल्ला

औरंगाबादच्या मिटमिटा परिसरात व्हिडिओ रील्सवरून झालेल्या वादातून तरुणांनी थेट मैत्रिणीच्या आईवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
aurangabad crime news
aurangabad crime news saam tv

नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणांवर व्हिडिओ रील्सचा क्रेझ वाढला आहे. त्यामुळे अनेकदा छोट्या-मोठ्या वादाच्या घटना देखील समोर येत आहेत. अशातच औरंगाबादच्या मिटमिटा परिसरात व्हिडिओ रील्सवरून झालेल्या वादातून तरुणांनी थेट मैत्रिणीच्या आईवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

aurangabad crime news
Dhule: मिरचीची पूड डोळ्यात टाकून चोरट्यांनी २४ लाख लुटले

आजकालची तरुणाई सोशल मीडियावर व्हिडिओ रील्सच्या प्रेमात पडली आहे. अनेक तरुण-तरुणी रील्स बनवताना दिसतात. या रील्सवरून आता छोट्या-मोठ्या वादाच्या घटना समोर आल्या आहेत. याच रील्सवरून झालेल्या वादातून तरुणांनी (Youth) थेट मैत्रिणीच्या आईवर हल्ला करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

aurangabad crime news
धक्‍कादायक..आत्‍महत्‍येचा बनाव करत पित्‍यानेचे मारले मुलीला; दोर गळ्यात टाकून फोटोही काढले

सदर घटनेप्रकरणी छावणी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, यातील एका आरोपीला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्याने नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.

मागील काही दिवसांमध्ये औरंगाबाद (Aurangabad) शहरात किरकोळ कारणांवरून चाकू हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच या घटनेची भर पडल्याने पुन्हा एका औरंगाबाद येथे किरकोळ कारणांवरून जीवघेणा हल्ला होण्याची मालिका सुरूच आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com