Mumbai High court: औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतर प्रकरण; मुंबई हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Aurangabad and Osmanabad cities Renaming: जिल्हा आणि तालुका पातळीवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Mumbai High Court
Mumbai High Court saam tv
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी...

Mumbai High Court News: औरंगाबाद आणि उस्मानबाद शहरांच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

या निर्णयाला जोरदार विरोध झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महत्वाचा निर्णय दिला असून जिल्हा आणि तालुका पातळीवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Mumbai High Court
Green Fodder: पंढरपुरात हिरव्या चाऱ्याचे भाव भडकले; पाऊस नसल्याने चाऱ्याची टंचाई

याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु तालुका आणि जिल्हा पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

या प्रकरणी सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणारी याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सध्यातरी तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली आहे.

Mumbai High Court
Sambhajinagar News: ...तर महिला सरपंचाचे पद जाऊ शकते; ग्रामपंचायतीतील सरपंचांच्या पतींची लूटबूड थांबणार

आता औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे. तसेच जेव्हा शासन आदेश निघेल त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या उपस्थितीत हे कामकाज पार पडले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com