Aurangabad: सत्तारांचा दानवेंना पुन्हा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत!

सोयागाव नगरपंचायत मध्ये भाजपला खिंडार पडलेले पाहायला मिळत आहे.
Aurangabad
Aurangabadअविनाश कानडजे
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबाद : सोयगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये (Soyagaon Nagar Panchayat Election) शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव केला होता. आज पुन्हा एकदा सत्तार यांनी दानवेंना आणखी एक धक्का दिला आहे. सत्तार यांनी भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सेनेत खेचून आणले आहेत. यामध्ये 6 पैकी 4 जण शिवसेनेत दाखल झाले आहे. तर उरलेले दोन जण सुद्धा सेनेच्या वाटेवर आहे.

शिवसेनेने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. एकूण 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने बहुमत मिळवले होते. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का बसला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी बरोबर भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेकडे वळविले आहेत. या 4 जणांचा शिवसेनेत औपचारिक प्रवेश झाला असून लवकरच अधिकृतही प्रवेश होईल.

Aurangabad
Photos: पहा अभिनेत्री पूजा हेगडेचे एथनिक लूक्स!

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनामध्ये टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे दोन मोठे दिग्गज नेते एकमेकांच्या आमनेसामने होते. यामुळे दोन्ही बाजूने तगडी फिल्डिंग लावली होती. पण या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जास्त झालेले दिसले.

सोयगाव नगरपंचायतीत आपण जिंकणार असा दावा करणाऱ्या दानवेंनी केला होता. परंतु त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला 17 पैकी तब्बल 11 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे पुन्हा आता शिवसेनेत भाजपचे नवविर्वाचित सदस्य दाखल झाल्यामुळे दानवेंची मोठी नाचक्की झालेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com