नाशिक: सोशल मीडियावरती (Social Media) सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरती २०१८ पैशांची लालुच दाखवत मराठा क्रांती मोर्चामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
या क्लिपमध्ये दोन व्यक्ती आपापसात बोलताना त्याबाबतचा उल्लेख करत आहेत. मात्र ही या क्लिपची सत्यता किती आहे आणि तसं काही असतं तर त्याचं वेळी बाहेर आलं असतं असं म्हणत पाटील यानी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पाहा व्हिडीओ -
आरोप काय -
चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष असून त्यांनी पहिल्याच बैठकीत समन्वयकांना पैशाच प्रलोभण देत मॅनेज करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
तर यावर साम टीव्हीशी प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, या ऑडिओ क्लिपची (Audio clip) व्हॅलीडीटी किती आहे, जर मी असा प्रयत्न केला असता तर तो त्याच वेळी समोर आला असता. संपूर्ण मराठा समाजाला महिती आहे की, मराठा समाजाला इतकी वर्षे न मिळालेलं आरक्षण आम्ही दिलं आहे.
आम्ही न्यायालयात टिकणार आरक्षण दिलं, जे न्यायालयात १ वर्षे टिकल. मराठा समाजातील मुलांना नोकऱ्या मिळाल्या. तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षम सरकारमुळे गेलेले आरक्षण ही आम्ही मिळवून देणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.