Neet Exam News : NEET घोटाळ्याचे धागेदोरे बीडपर्यंत, दोन शिक्षकांना एटीएसने घेतलं ताब्यात

Beed Neet Exam Scam News : बीड जिल्ह्यातील दोन संशयित शिक्षकांचा नीट पेपरफुटीप्रकरणात हात असल्याची प्राथामिक माहिती आहे. त्यामधील एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीड : देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील दोन संशयित शिक्षकांचा पेपरफुटीप्रकरणात हात असल्याची प्राथामिक माहिती आहे. त्यामधील एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

नीट घोटाळ्यात या दोघांनाही संशयीत म्हणून चौकशीसाठी नांदेड एटीएसने बोलावून घेतल्याचं समोर आलंय. दोघेही लातूरच्या एका आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पाहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पोलिसांनी प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीवरून बीड जिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे. यांची चौकशी केल्यानंतर आणखी काही नावे पुढे येतील का ? याकडं लक्ष लागलं आहे, मात्र यामुळे बीड जिल्ह्यातील शिक्षणं क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com