Maharashtra Politics: 'मविआ'त ऑल इज वेल! जागा वाटपाचा तिढा पण ठाकरे गटाशी वाद नाही; काँग्रेसचे स्पष्टीकरण, दिल्लीत बैठक

Maharashtra Assembly Election 2024: ठाकरेंची शिवसेना वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे, अशातच आता यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही वाद नाहीत, असा दावा केला आहे.
मविआत ऑल इज वेल! जागा वाटपाचा तिढा पण ठाकरे गटाशी वाद नाही; काँग्रेसचे स्पष्टीकरण, दिल्लीत बैठक
Uddhav Thackeray and Nana PatoleSaam Tv
Published On

Maharashtra Politics: विधानसभेच्या जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सध्या वादाचे फटाके फुटत आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विदर्भ, नागपूर तसेच सांगोल्यातील जागांवरुन दावे- प्रतिदावे सुरु आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे तसेच काही मोठे निर्णय घेऊ, असे संकेतही संजय राऊत यांनी दिलेत. त्यामुळेच ठाकरेंची शिवसेना वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे, अशातच आता यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही वाद नाहीत, असा दावा केला आहे.

महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागा वाटपावरुन वादाला तोंड फुटले आहे. विदर्भ, नागपूर, तसेच सांगोल्याच्या जागेवरुन ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे, दुसरीकडे काँग्रेसही आपल्या मागणीवर ठाम आहे त्यामुळेच दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुनच आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली, त्यानंतर आदित्य ठाकरे तातडीने शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी चव्हाण सेंटरवर पोहोचलेत.

आघाडीमध्ये वाद रंगल्याची चर्चा असतानाच काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळला आहे. आमच्यात काही जागांवर तिढा आहे मात्र कोणताही वाद नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. तसेच जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तिढा सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. राज्यातील काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल यांची भेट घेणार असून या वादांच्या जागेवर चर्चा होणार आहे.

मविआत ऑल इज वेल! जागा वाटपाचा तिढा पण ठाकरे गटाशी वाद नाही; काँग्रेसचे स्पष्टीकरण, दिल्लीत बैठक
Maharashtra Politics: महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपावर तब्बल ९ तास खलबतं, आज काँग्रेसची दिल्लीत बैठक, उमेदवार फायनल होणार

काँग्रेस- ठाकरे गटात या जागांवरुन वाद!

दरम्यान, नाशिक पश्चिम जागेवरून रात्रीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खटके उडल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पश्चिम जागेवर ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिलेत. तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले आणि संजय राऊत दोघेही अडून बसलेत. त्यानंतर संजय राऊत तडकाफडकी निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काँग्रेसची ताकद असलेल्या विदर्भातील 12 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्याने वाद सुरु आहे.

मविआत ऑल इज वेल! जागा वाटपाचा तिढा पण ठाकरे गटाशी वाद नाही; काँग्रेसचे स्पष्टीकरण, दिल्लीत बैठक
Beed Accident : बीडमध्ये १५ मिनिटांत २ भीषण अपघात, कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या; २ महिन्याच्या मुलीचा हात तुटला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com