हेलिकॉप्टरद्वारे फक्त सहा तासांत अष्टविनायक दर्शन!

ओझर देवस्थानच्या पुढाकारातुन हवाई मार्गाने देवदर्शन...
हेलिकॉप्टरद्वारे फक्त सहा तासांत अष्टविनायक दर्शन!
हेलिकॉप्टरद्वारे फक्त सहा तासांत अष्टविनायक दर्शन!SaamTVnews
Published On

खेड : आजपर्यंत अष्ठविनायक यात्रा एक दिवसात पुर्ण करण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागत होती. मात्र, आता हि कसरत थांबणार आहे. अष्टविनायकाच्या (Ashtavinayak) आठ गणपतींचे दर्शन एका दिवसात पुर्ण करण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. मात्र सध्याची वाहतुक कोंडी, दर्शन बारीच्या रांगा यामुळे हे शक्य होतं नव्हतं. यासाठी ओझर देवस्थानने पुढाकार घेऊन अष्टविनायकातील सर्व देवस्थान ट्रस्टला सोबत घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेत हेलिकॉप्टर (Helicopter) द्वारे अष्टविनायक दर्शन हा उपक्रम हाती घेतला आहे.

हे देखील पहा :

आज सकाळी सहा जणांनी ओझरच्या विघ्नेश्वरपासून अष्टविनायक यात्रेला सुरुवात केली असुन अष्टविनायक यात्रेचा शेवट लेण्याद्रीच्या गिरिजात्मजा जवळ होणार आहे. या यात्रेसाठी एक लाख रुपये तिकिट ठेवण्यात आले असुन आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सेवा सुरु रहाणार असल्याचे देवस्थान अध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले आहे. आजपर्यत अनेकांनी अष्ठविनायक यात्रेचा प्रवास पायी, सायकल, दुचाकी तसेच कारने केला आहे. मात्र, या ऐवजी आता हेलिकॉप्टरमधून अष्टविनायक दर्शन (Ashtvinayak Darshan) मिळणार असल्याने भाविकांनी देवस्थानचे आभार मानले.

हेलिकॉप्टरद्वारे फक्त सहा तासांत अष्टविनायक दर्शन!
बीड : 10 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला!

अष्ठविनायक यात्रेबरोबर शिर्डी (Shirdi) आणि भिमाशंकर (Bhimashankar) दर्शनाची सुविधाही उपलब्ध करावी अशी विनंतीही यावेळी भाविकांनी केली आहे. अष्टविनायक हेलिकॉप्टर यात्रा ओझरमधुन विघ्नहर्ताचे दर्शन घेऊन सुरु झाली असुन प्रत्येक देवस्थानमध्ये या भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनसेवा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे अष्ठविनायक यात्रा विनाविघ्न पार पडण्यासाठीचा हा उपक्रम यशस्वी होईल

हेलिकॉप्टरद्वारे फक्त सहा तासांत अष्टविनायक दर्शन!
अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने डोक्यात वीट मारून केली पत्नीची हत्या

जुन्नर (Junnar) तालुक्यातील देवस्थान, पर्यटनस्थळांमुळे जुन्नरच्या अर्थकारणाला चालना मिळत असताना अष्टविनायक यात्रा आता हवाईप्रवासाद्वारे सुरु झाल्याने पर्यटनासह देवदर्शनासाठी जगभरातून भाविक यामध्ये सहभागी होते. यातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊन अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचा अंदाज स्थानिक व्यक्त करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com