बेइमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला दूर व्हावं लागलं - विनायक राऊत

मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचे हा कुटील डाव ईडीचा आहे.अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत.
बेइमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला दूर व्हावं लागलं - विनायक राऊत
बेइमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला दूर व्हावं लागलं - विनायक राऊतअनंत पाताडे
Published On

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग - बावनकुळेनचे वक्तव्य गांमभिर्याने घेण्याची गरज नाही. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा ससेमिरा लावायचा,सीबीआयचे प्रेशर आणायचे आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने लिहून घ्यायचे. मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचे हा कुटील डाव ईडीचा आहे.अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत. As the BJP reached the peak of dishonesty the Sena had to withdraw

प्रताप सरनाईक यांना जो काही त्रास होतो आहे त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.ज्या पद्धतीने ईडी त्रास देते आहे प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे केवळ आणि केवळ केंद्र सरकारने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे अशी टीका विनायक राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली आहे.

हे देखील पहा -

तर चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत विनायक राऊत म्हणाले की, भाजप सेना यांची युती नैसर्गिक होती.पण त्यावेळेला बेइमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला भाजपकडून दूर व्हावं लागलं.चंद्रकांत पाटीलांनी संजय राऊत साहेबांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही.स्वतःच्या बुडाखाली जे काही जळत आहे ते आधी सांभाळा. संपूर्ण देशात केंद्राच्या माध्यमातून ईडी आणि सीबीआय,एनआयएचा ससेमिरा लावायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा हा एकमेव धंदा केंद्र सरकारने चालू केलेला आहे. As the BJP reached the peak of dishonesty the Sena had to withdraw

बेइमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला दूर व्हावं लागलं - विनायक राऊत
पवारांच्या आजच्या बैठकीमुळे काँग्रेस अस्वस्थ?

नरेंद्र मोदींचे मी मनापासून अभिनंदन करेन की उद्धव ठाकरे यांचे कोरोनावर केलेल्या कामावर त्यांनी मनापासून प्रशंसा केली. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे ठामपणे चालणार. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे देखील सांगायला विनायक राऊत विसरले नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com