

Weather Update : राज्यात सध्या थंडी आणि उन्हाळा असे दोन्ही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. काळी मुंबईसह अन्य शहरांत गुलाबी थंडी जाणवत आहे. तर दुपारी कडक उन्हाळा जाणवतो आहे. उन्हाळ्याला सुरूवात होताच एकीकडे मुंबईकर घामुघूम झालेत. तर दुसरीकडे नागपूरात अचानक पारा घसरत चालला आहे. (Latest Weather Update News)
उन्हाळ्याची चाहूल लागत असताना नागपूरात अचानक पारा घसरला आहे. हवेत गारठा वाढला असून १०.७ किमान तापमानाची नोंद करण्यात आलीये. मुंबईत आणि इतर ठिकाणी मात्र सरासरी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये सरासरी पेक्षा किमान तापमान ४.८ ने घसरले आहे. या ठिकाणी दिवसा उन्हाचे चटके तर रात्री रात्री थंडी वाजत आहे. बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात अनेक लहान मुलांना सर्दी, खोकला असे आजार जाणवत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.