अकोला : परमबीर सिंग यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयावर शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी ताशेरे ओढले आहेत. ते अकोल्यात सेनेचे आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी बोलत होते. देशांमधील लोकशाहीचे चार स्तंभ सध्या कितपत मजबुतीने उभे आहेत, अशी शंका वाटावी, असं सगळं वर्तन देशांमध्ये सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तर अमोल मिटकरी यांनी परमबीर सिंग भारतात आहेत. तर ते आतापर्यंत कुठे लपले होते असा आरोप केला आहे. ते अमित शहा यांच्या आशीर्वादानेच भारतात लपून बसल्याचा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला आहे.
तर अरविंद सावंत यांनी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आज राज्यसभेत आहेत त्यांच एक वाक्य फार महत्त्वाचा आहे. मध्यंतरीच्या काळात काही विषय आला तर ते म्हणाले की मी सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही. तिथे न्याय मिळेल याची अपेक्षा नाही. आता सर्वसामान्य माणूस असं असतं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय न्याय दिला असता असं सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडेल. देशाच्या संविधानामध्ये असं काही अपवाद काही विशिष्ट लोकांसाठी आहेत का असं अलिकडे देशाच्या सगळ्या महत्त्वाच्या संस्थांकडून वागले जाते.
म्हणून मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये त्यांना काय अभिप्रेत होतं आणि ते खरंच असं घडतंय का असं जेव्हा विचारतो तेव्हा लक्षात येतं देशांमधील लोकशाहीचे चार स्तंभ सध्या कितपत मजबुतीने उभे आहेत, अशी शंका वाटावी, असं सगळं वर्तन देशांमध्ये सुरू आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.