Konkan Rain: राज्यात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस; चक्रीवादळाची शक्यता

Arabian Sea Cyclone: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Konkan Rain
Konkan RainSaam TV
Published On

Ratnagiri News:

सप्टेंबर महिन्यात मुंबई पुण्यासह राज्यात काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसला. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस पाऊस राज्यातून एक्सिट घेईल असा अंजाद वर्तवण्यात आलाय. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढलाय. तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झालीये, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. (Latest Marathi News)

Konkan Rain
Hingoli Rain News: हिंगोलीत पावसाचे रौद्ररुप... ओढ्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली; सालगड्यासह दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृ्त्तसंस्थेने या बाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे शनिवारी रत्नागिरीमध्ये नौका बंदरावरच उभ्या होत्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवसही मासेमारी बंद राहणार आहे.

शनिवारी आणि रविवारी देखील रत्नागिरीत धोधो पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारी २४ तासांत १२.४४ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनला ३०६४ मिमी पावसाची नोंद झालीये. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिलाय.

केरळसह गोवा राज्याच्या किनारी भागात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. किनारपट्टीवर समुद्र शांत असला तरी खोलवर समुद्रात धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Konkan Rain
Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४८ तासांत पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com