Karjat Bazar Samiti: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का; कर्जत बाजार समितीवर भाजपचा झेंडा!

या निवडणूकीत रोहित पवार (Rohit Pawar) आणि राम शिंदे (Ram Shinde) या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
Rohit pawar and Ram Shinde
Rohit pawar and Ram ShindeSaam Tv
Published On

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Karjat Bazar Samiti 2023: कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड आज पार पडली. या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीत भाजपचे काकासाहेब तापकीर यांची सभापतीपदी तर अभय पाटील उपसभापती यांनी विजय मिळवला आहे.

Rohit pawar and Ram Shinde
Old Man Viral Video: संघर्ष जगण्याचा! ९५ वर्षीय आजोबांची पोट भरण्यासाठी धडपड; व्हिडिओ पाहून पाणावतील डोळे...

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित पवार (Rohit Pawar) आणि राम शिंदे (Ram Shinde) या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी 9 जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित 9 जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले.

या अटीतटीच्या लढतीमुळे सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज ही निवड प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये भाजप आमदार राम शिंदे गटाने बाजी मारली आहे. निवडणूकीत दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. (Maharashtra Politics)

Rohit pawar and Ram Shinde
ReelStar ACB Inquiry : रीलस्टार पूजा भोईर ACBच्या चौकशीच्या फेऱ्यात, विदेशवारीवर लाखो रुपये उधळले

यावेळी रोहित पवारांची मते फुटल्याने राम शिंदे यांच्या गटाचा सभापती आणि उपसभापती झाला. यावेळी सभापती पदासाठी 9 मतदान तर राष्ट्रवादीचे एक मत बाद झाल्याने भाजपने विजय साकारत पंचायत समितीवर झेंडा फडकावला आहे. या निकालाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com