
95 Year Old Man Play Drump Viral Video: दैनंदिन जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष लिहलेला असतो. पोट भरण्यासाठी, आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मात्र अनेकदा हाच पोटा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतो. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
ज्यामध्ये एका ९५ वर्षीय आजोबांची पैसे मिळवण्यासाठीची धडपड पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. काय आहे या आजोबांची संघर्षमय कहाणी, चला जाणून घेवू. (Old Man Work Hard Viral Video)
परिस्थितीमुळे माणसाला कोणत्याही वयात जबाबदारी घ्यावी लागते. कष्ट करावे लागते. कधी कमी वयात मोठ्या जबाबदारीचं ओझ अंगावर पडतं तर कधी म्हातारपणीही कष्ट करण्याची वेळ येते. सध्या अशाच एका ९५ वर्षीय आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये आजोबांना आराम करण्याच्या, निवांत घरी राहण्याच्या वयातही कष्ट करावे लागत आहेत. आजोबांचे कष्ट बघून सर्वजण भावूक झाले आहेत. तर अनेकांनी या बाबांच्या या वयातही धडपडण्याच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)
व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) आजोबा लग्नात ढोल वाजवताना दिसत आहेत. चालतानास उठताना त्यांना होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. तरीही ते आपले काम प्रामणिकपणे करत चार पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी जमिनीवर बसून तर कधी उभे राहून हे आजोबा समारंभामध्ये ढोल वाजवताना दिसत आहेत. या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
@mr_pandeyji_198 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ए 1.7 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी बाबांच्या परिस्थिती पाहून दुःख व्यक्त केले आहे. तर काही जणांनी त्यांना मदत करण्यााचीही इच्छा व्यक्त केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.