

हे आहे महाराष्ट्राचं पॉवर सेंटर.... लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीचं प्रशासकीय केंद्र म्हणजेच मंत्रालय... मात्र याच मंत्रालयात महाराष्ट्राला लाज आणणारी घटना घडलीय....मंत्रालयाला लाचखोरीचा विळखा पडलाय..
होय....हाच तो अन्न व औषध प्रशासन विभागाचा क्लर्क राजेंद्र ढेरंगे... यालाच मंत्रालयात 35 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने सापळा रचून अटक केली आणि ढेरंगेवर गुन्हा दाखल केला... त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडालीय...मेडिकलचं रद्द केलेलं लायसन्स रिन्यू करण्यासाठी राजेंद्र ढेरंगेनं 50 हजार रुपयांची लाच मागितली होती..मात्र त्यानंतर कशी तडजोड झाली आणि ढेरंगे कसा रंगेहात पकडला.. त्याची माहितीच तक्रारदारानं दिलीय..
मंत्रालयात लाचखोरीच्या प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले... त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आपल्यापर्यंत आल्यास आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळांनी व्यक्त केलीय
दुसरीकडे राजेंद्र ढेरंगेला अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं... यावेळी लाचलुचपत विभागानं सत्र न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला..न्यायालयात नेमकं काय घडलं...पाहूयात...
राजेंद्र ढेरंगेला न्यायालयात हजर करण्यात आलं.. त्यानंतर न्यायालयाने ढेरंगेला एसीबी विरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. मात्र आपली कुठलीही तक्रार नसल्याचं ढेरंगेनं म्हटलं. तसंच मेडिकल आणि केस डायरीबद्दलही विचारणा केली.. त्यानंतर एसीबीच्या वकीलांनी युक्तीवाद करताना मेडिकल दुकानाचं 12 दिवसांसाठी निलंबन केल्याप्रकरणी ढेरंगेला लाच घेताना रंगेहात पकडलं.. त्याच्याकडे 43 हजार 270 रुपये रक्कम आढळली. ही रक्कम कशाची आहे?
ढेरंगेच्या वरिष्ठांचा गुन्ह्याशी काही संबंध आहे का? याबरोबरच मालमत्तेबाबत माहिती घ्यायची आहे. त्यामुळे ढेरंगेला एसीबी कस्टडी देण्याची मागणी केली. यानंतर आरोपीच्या वकीलांनी आरोपीची व्हाईस सॅम्पल तपासणी आणि त्याच्या संपत्तीची तपासणी करा.. कारण जी रक्कम सापडली आहे ती जप्त केली आहे. त्यामुळे आरोपीला एसीबी कस्टडी ऐवजी न्यायालयीन कस्टडी देण्याची मागणी केली. यानंतर न्यायालयाने 16 फेब्रुवारीपर्यंत ढेरंगेला एसीबी कोठडी सुनावलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.