Anna Hajare : महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर १, अण्णा हजारे संतापले; ठाकरेंवरही टीकेचा बाण

Anna Hajare Angry : भ्रष्टाचारात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत हजारेंनी संताप व्यक्त केला.
Anna Hajare Angry Over corruption
Anna Hajare Angry Over corruptionSAAM TV
Published On

सुशील थोरात, अहमदनगर

Anna Hajare Anger over corruption :

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून संतापले आहेत. भ्रष्टाचारात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. ही महाराष्ट्राला मान खाली घालवणारी आणि लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत हजारेंनी संताप व्यक्त केला.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो २०२२ च्या (National Crime Records Bureau) अहवालानुसार भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ही बाब देशात महाराष्ट्राला (Maharashtra) मान खाली घालवणारी आणि लाजीरवाणी आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.

महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी हजारे यांनी आता तरुणांना साद घातली आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र  (Maharashtra News) करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक शहरात तालुक्यात, गावात, वाड्यावस्त्यांवर भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्यासाठी समिती स्थापन करून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे अण्णा हजारे (Anna Hajare) म्हणाले.

अण्णा हजारेंचे ठाकरेंवर टीकास्त्र

मागील अधिवेशनात प्रलंबित राहिलेले लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेतही मंजूर झाले आहे. त्यावर अण्णा हजारे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Anna Hajare Angry Over corruption
Maratha Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाची मन की बात कधी ऐकणार? मराठा क्रांती माेर्चा

या कायद्याच्या लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी राज्याचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्कालीन सरकारने केवळ आश्वासन दिलं, पण कायदा केला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वेळ लावला, मात्र कायदा केला. तत्कालीन ठाकरे सरकारला हा कायदा नकोच होता, अशा शब्दांत हजारेंनी टीकास्त्र सोडलं.

Anna Hajare Angry Over corruption
Ethanol Production: ..म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com