पूरग्रस्तांची थट्टा: मदतीसाठी दिलेले चेक परत घेतले

सरकारने पूरग्रस्तांची थट्टा चालवली आहे का?
पूरग्रस्तांची थट्टा: मदतीसाठी दिलेले चेक परत घेतले
पूरग्रस्तांची थट्टा: मदतीसाठी दिलेले चेक परत घेतलेSaam Tv news
Published On

एकीकडे सरकारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी (11500 Corer) रुपयांचे पॅकेज (Package) जाहीर केले. तर दुसरीकडे रत्नागिरीतील पोसरे गावातील ( Posare Ratnagiri) पुरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक परत घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांची थट्टा चालवली आहे का? असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विचारला आहे. तर फक्त फोटोसेशनसाठी चेक दिले होते का? संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.

पूरग्रस्तांची थट्टा: मदतीसाठी दिलेले चेक परत घेतले
विठ्ठलाच्या चरणी; तब्बल एक कोटींची देणगी!

याबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ११,५०० कोंटीचा निधी राज्यसरकारने पुरग्रस्तांसाठी जाहीर केला आहे. पण पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील तर हे दुर्देव आहे. असे करुन अनिल परब पुरग्रस्तांची क्रुर चेष्टा करत आहेत, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान काल राज्यसरकारने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तथापि, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी या आरोपांवर खुलासा केला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com