अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात जाणार नाहीत (पहा व्हिडीओ)

माध्यमांशी प्रतिक्रिया देताना देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह म्हणाले कि, आम्ही ईडीला पूर्णपणे सहकार्य करत असून आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात जाणार नाहीत
अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात जाणार नाहीत Saam tv news
Published On

आर्थिक गैरव्यवहार आणि १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांमुळे ईडीच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून सलग पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहे. या आरोपांमुळे देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, चार वेळा समन्स पाठवण्यात येऊनही, न्यायालयीन याचिकेचा हवाला देत चौकशीस गैरहजर राहणारे देशमुख याही वेळेस चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

देशमुखांऐवजी त्यांच्या वतीने इंद्रजित सिंह या चौकशीस उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत माध्यमांशी प्रतिक्रिया देताना देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह म्हणाले कि, आम्ही ईडीला पूर्णपणे सहकार्य करत असून आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आज आम्ही अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सला उत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाने आमची याचिका दाखल करून घेतली असून या याचिकेवर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली असूनसुद्धा ईडीकडून देशमुख यांना वारंवार समन्स का पाठवण्यात येत आहे? सदर प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे देखील सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात जाणार नाहीत
ईडीच्या चौकशीस चकवा दिल्यास देशमुखांच्या अडचणी वाढणार

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीने पाचव्यांदा समन्स बजावला होता. आज ईडीच्या दक्षिण मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हा समन्स होता. त्यामुळे या चौकशीस सामोरे जाण्याखेरीज देशमुख यांना गत्यंतर नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, देशमुख यांच्या ऐवजी आता त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे चौकशीस उपस्थित राहणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com