अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय करणार मुलाला आणि सुनेला अटक?

देशमुख यांच्य नागपुरातल्या घरी सीबीआयचे पथक दाखल
अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय करणार मुलाला आणि सुनेला अटक?
अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय करणार मुलाला आणि सुनेला अटक?Saam Tv

नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. गेल्या २ महिन्यांपासून त्यांचा पत्ता लागत नाही आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा पत्ता जाणून घेण्यासाठी सीबीआयने एक नवीन शक्कल लढवली आहे. देशमुख यांच्य नागपुरातल्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले आहेत. एकूण ५ ते ६ अधिकारी देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत.

हे देखील पहा -

सकाळी आठच्या सुमारास सीबीआयचे पथक देशमुख यांच्या नागपूर येथील निवास्थानी दाखल झाले. त्यांच्याकडे अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचे वॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांना वारंवार नोटीस पाठवून देखील ते चौकशीसाठी समोर आले नाहीत.

अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय करणार मुलाला आणि सुनेला अटक?
चोरांचा कलेक्टरलाचं उलट प्रश्न; जर घरात पैसे नव्हते तर...

लूक आऊट नोटीस बजावल्यानंतरही अनिल देशमुख समोर आले नाहीत. त्यामुळे आता सीबीआयने त्यांचा मोर्चा अनिल देशमुख यांचा मुलगा आणि सुन यांच्याकडे वळवला आहे. सीबीआयचे पाच ते सहा अधिकारी सकाळी आठ वाजता अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे त्यांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात 4 कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे आता मुलाला आणि सुनेला अटक झाली तर अनिल देशमुख समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान सीबीआयचे दोन अधिकारी अनिल देशमुख यांच्या घराबाहेर निघाले असून एका अधिकाऱ्याच्या हातात सरकारी लिफाफा होता. सात अधिकाऱ्यांकडून अजूनंही तपासणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com