सांगली : महाविकास आघाडी सरकारने (mva) सत्तेत आल्यावर अंगणवाडी सेविकांना (anganwadi worker) मानधन वाढ करतो असे आश्वासन दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने अद्यापी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ न केल्याने जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांना आज सांगली (sangli) जिल्हा परिषदेवर माेर्चा काढला. (sangli latest marathi news)
अंगणवाडी सेविकांना पेन्शन नव्याने सुरू करण्यात यावी. अंगणवाडीत नवीन मोबाईल देण्यात यावेत तसेच मानधनात वाढ करावी या व अन्य मागण्यांसाठी हा इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सेविका सहभागी झाल्या होत्या.
रणरणत्या उन्हात महिलांनी मोर्चा काढला हाेता. उन्हाची काहिली झाल्याने काही सेविका छत्री घेऊन माेर्चात सहभागी झाल्या. जिल्हा परिषदेचा परिसर महिलांनी घाेषणा देत दणाणून साेडला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदाेलन (andolan) छेडण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.