अमरावतीमध्ये विकास कामांच्या श्रेयवादावरुन आमदार-खासदारात जुंपली आहे. एकाच रस्त्याचं दोनदा उद्घाटन केल्याचं समोर आलं आहे. खासदार नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर (Navneet Rana Against Yashomati Thakur) यांच्यात नेहमीच खटके उडत असतात. आता विकास कामांवरून दोघींमध्ये पुन्हा वाद सुरू झाला आहे. (Latest Marathi News)
विकास कामाच्या मुद्यावरून अमरावतीत खासदार नवनीत राणा व काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू झालाय. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुकलेश्वर ते म्हेसपुर रस्त्याचं भूमिपूजन दोन दिवस अगोदर रात्री काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. मात्र, याच रस्त्याचं भूमिपूजन खासदार नवनीत राणा यांनी देखील रात्री (Amravati Politics) केलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एकाच रस्त्याचं दोनदा भूमिपूजन
अर्थसंकल्प 2022 -23 अंतर्गत या रस्त्याचं काम करीत असल्याचा उल्लेख खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या भूमिपूजन फलकावर आहे. तर 2023 -24 अर्थसंकल्प अंतर्गत या रस्त्याचं काम करण्यात येत आहे, असा उल्लेख यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या भूमिपूजन फलकावर नमूद करण्यात आलाय.
राणा-ठाकुर यांची टिका
इतकचं नाही, तर दोघींनीही भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी एकमेकींवर टीका केलीय. ज्याचं लेकरू त्यांनीच बारसं करावं, शेजारच्यांनी नाही असा टोला नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला आहे. तर, ननंदबाई आहे त्यांना झेलावच लागतं, असा चिमटाही नवनीत राणा यांनी काढला आहे.
लोकसभेचं इलेक्शन आहे, त्यामुळे हिरोइन मटकून राहिली. गोरी आहे. चांगला डान्स करते, पण काम नाही असा जोरदार टोला यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा लगावला ((Amravati Politics) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.