Amravati News: भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक; नक्की काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Amravati News: बैलगाडा शर्यतीदरम्यान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून यात ते किरकोळ जखमी झाले आहेत.
Amravati News
Amravati NewsSaam Digital
Published On

अमर घटारे

Amravati News

बैलगाडा शर्यतीदरम्यान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी तिवसा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अनिल बोंडे यांनी यामागे राजकीय हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवसा येथे भाजपचे उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी राज्यस्तरीय किसान शंकरपटाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळी 5 वाजता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे हे देखील गेले होते. यावेळी काही अज्ञातांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. काहीवेळ कोणालाच काही समजलं नाही. त्याचवेळी अनिल बोंडे यांच्या पाठीमागून दगड भिरकावण्यात आले. दरम्यान दगडफेकीत त्याच्या पाठीत आणि डोक्यात मार लागल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोण किती जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक? फडणवीसांनी सांगितला आकडा...

दरम्यान अनिल बोंडे यांनी याप्रकरणी तिवसा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून यामागे राजकीय हात आहे का, याचा शोध घेणार असल्यांच म्हटलं आहे. बैलगाडा शर्यतीत काही लोकांनी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दगडफेक करणारं टोळकं नेमक कोणाचं आहे. याचा शोध घ्यावा लागेल. काही समाजकंटक आपल्या गावाला बदनाम करत असतील तर त्याची काळजी घ्यावी लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Amravati News
Prakash Ambedkar: आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला; जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com