Amravati News : आजीचा तो प्रवास अखेरचा ठरला! धावत्या एसटी बसमध्येच वृद्धेला हार्ट अॅटॅक

Heart Attack News : धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढायला लागले आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे. अशावेळी कोणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल हे सांगणं अवघड आहे.
ST Bus News
ST Bus NewsSaamTv
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आर्थिक-सामाजिक स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढायला लागले आहेत. त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाणही वाढलं आहे. अशातच कोणाला कधी, कुठे हृदयविकाराचा झटका येईल हे सांगता येत नाही.

एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेलाही अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रवासादरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रवासासाठी तिकीट खरेदी करत असतानाच या महिलेला मृत्यूने कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा धावत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नवसारीजवळ घडली आहे. ही महिला बसमध्ये अचानक बेशुद्ध पडल्याने चालक- वाहकाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. मात्र त्यानंतर पोलिस डॉक्टरांना घेऊन येईपर्यंत महिलेचा मृत्यू झाला.

ST Bus News
Parbhani News : परभणी का पेटलं? कडकडीत बंद असताना नेमकं काय घडलं?|VIDEO

साऊर येथील पुष्पा रमेश सोनोने (वय ७२) या अमरावतीहून परतवाडा जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करत होत्या. यावेळी नवसारीजवळ वाहकांकडून तिकीट घेत असतांना अचानक सोनोने यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला. यात पुष्पा सोनोने यांनी जागीच आपले प्राण सोडले.

यानंतर एसटी बस वाहकांनी पोलिसांना सूचना दिली. त्यानतंर गाडगेनगर पोलीसांनी जिल्हा रूग्णालयाला माहिती देत रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. मात्र डॉक्टरांनी सोनोने यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ तणाव बघायला मिळाला.

ST Bus News
Parbhani Update : परभणी बंदला हिंसक वळण, काय म्हणाले प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील एका 39 वर्षीय बस चालकाला ड्यूटीवर असतानाच ह्रदयविकाराचा झटका आला होता. चालक बस चालवत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ह्रदयविकाराचा झटका येताच त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्ता सोडून पळू लागली. अंगावर काटा आणणारी ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. बस चालवत असतानाच चालकाचा ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अशा घटनांमध्ये वाढ व्हायला लागली असल्याने धकाधकीच्या या जीवनशैलीबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे.

ST Bus News
Mumbai Local Train : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पनवेल ते CSMT दरम्यान तांत्रिक बिघाड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com