Maharashtra Politics: अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! विधानसभेच्या जागांवरुन पती- पत्नीमध्ये रस्सीखेच; रवी राणा- नवनीत राणा आमने-सामने

Maharashtra Assembly Election 2024: अमरावती जिल्ह्यातील बडनेरासह अचलपूर, मेळघाट, दर्यापूर या चार जागा आपल्या युवा स्वाभिमान पक्षाला मिळाव्या यासाठी आज अंबादेवीकडे साकड घातल आहे.
Maharashtra Politics: अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! विधानसभेच्या जागांवरुन पती- पत्नीमध्ये रस्सीखेच; नवी राणा- नवनीत राणा आमने-सामने
Ravi Rana navneet RanaSaam Tv
Published On

अमर घटारे, अमरावती

पूर्ण राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अमरावती जिल्ह्यामध्ये उमेदवारीवरुन वाद पाहायला मिळायला मिळत आहे. अमरावतीमधील विधानसभेची जागा मिळवण्यासाठी राणा दांपत्यामध्येच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दावा केल्याने नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

Maharashtra Politics: अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! विधानसभेच्या जागांवरुन पती- पत्नीमध्ये रस्सीखेच; नवी राणा- नवनीत राणा आमने-सामने
Crime News: लॉजमध्ये भयंकर कांड! सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या, नंतर प्रियकराने स्वतःला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील घटना

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संपूर्ण राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार रवी राणा यांचा पक्ष महायुतीमध्ये समाविष्ट आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरासह अचलपूर, मेळघाट, दर्यापूर या चार जागा आपल्या युवा स्वाभिमान पक्षाला मिळाव्या यासाठी आज अंबादेवी कडे साकड घातले आहे.

तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांच्या पत्नी माजी खासदार नवीन राणा ह्या आता भाजपमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा मेळघाट,दर्यापूर, अचलपूर या मतदार संघात भाजपचाच उमेदवार कमळ या चिन्हावर उभा राहिला पाहिजे व त्याचा प्रचार मी सुरू केला आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली. त्यामुळे राणा दाम्पत्यामध्ये आपापल्या पक्षाला जागा मिळवण्यासाठी घरातच रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे.

Maharashtra Politics: अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! विधानसभेच्या जागांवरुन पती- पत्नीमध्ये रस्सीखेच; नवी राणा- नवनीत राणा आमने-सामने
Maharashtra Politics : शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

नवनीत राणा ह्या भाजपच्या नेते आहे त्यामुळे त्यांची मागणी रास्ता आहे, त्यांनी मागणी केली पाहिजे, मात्र पक्ष हा घराच्या बाहेर आहे. घरामध्ये आम्ही दोघे एकत्र आहोत. घराच्या बाहेर आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. माझा युवा स्वाभिमान पक्ष आहे. त्यामुळे मी कोणत्याच पक्षाचा आजपर्यंत सदस्य झालो नाही आणि होणार पण नाही,नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत त्यांची भूमिका आहे कमळ फुलले पाहिजे, आणि माझी भूमिका आहे की युवा स्वाभिमान पक्षाचा पाना खुलला पाहिजे, असे रवी राणा म्हणाले.

तर मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, भाजपच्या नेत्यांनी अनेक वेळा म्हटले आहे की  येणाऱ्या काळात  मी लोकसभा राज्यसभेला  रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्या पद्धतीचे माझं बोलणं झालं आहे. अमरावती जिल्ह्यात जास्तीत जास्त कमळ या चिन्हावर आम्ही निवडून येऊ मात्र बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांचा पाना सर्व नटांना कचणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

Maharashtra Politics: अमरावतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! विधानसभेच्या जागांवरुन पती- पत्नीमध्ये रस्सीखेच; नवी राणा- नवनीत राणा आमने-सामने
Satara Politics: उमेदवारीचा तिढा, महायुतीत मिठाचा खडा! अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिंदे गटाची फिल्डिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com