अमर घटारे
अमरावती : पावसाळ्याच्या दिवसात साथरोगांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असतो. तर अमरावती जिल्ह्यात मागील नऊ महिन्यात चिकुनगुनिया व डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या आजाराचे प्रमाण वाढले असून सहाशेच्या वर रुग्णांना चिकुनगुनिया व डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे पाहण्यास मिळाले.
पावसाळा आला कि साथरोग पसरत असतात. यंदा सातत्याने पाऊस होत असल्याचे याचे प्रमाण अधिक राहिले आहे. यंदाच्या मान्सून मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याने रोगराई अधिक पसरली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात चिकुनगुनिया व डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण अधिक राहिले आहे. याशिवाय टायफाईड, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन झालेले रुग्णांची संख्या देखील मागील दोन- अडीच महिन्यात अधिक राहिली आहे.
ग्रामीण भागात अधिक रुग्ण
अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान चिकुनगुनियाचे तब्बल २८२ रुग्ण आढळले आहे. तर डेंग्यू रुग्णांची संख्या देखील ३१० इतकी पोहोचली आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे जिल्हा हिवताप विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात नऊ महिन्यांत तब्बल २८२ रुग्ण आढळले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात ६३ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २१९ रुग्ण आढळले. त्याचबरोबर डेंग्यूच्या ३१० रुग्णांपैकी २२९ हे ग्रामीण भागात तर मनपा क्षेत्रातील ८१ रुग्ण आहेत.
आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कीटकजन्य आजारांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. यात आरोग्य विभागाकडून फॉगिंग, लार्वानाशक फवारणी, साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात येते. तसेच नागरिकांनी घराच्या परिसरात साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे, कुलर, फुलदाणी, टाक्या, बादल्या यामध्ये डासांची पैदास होऊ नये. यासंदर्भात जनजागृती केली जाते. परंतु तरीही यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.