Corona Positive : अमरावतीत डेंग्यूसोबत कोरोनाही वाढतोय; दीड महिन्यात ३७ कोरोना पॉझिटिव्ह

Amravati News : पावसाळा सुरु झाल्यापासून अमरावती शहरासह जिल्ह्यात साथरोगांचा फैलास मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रामुख्याने डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्ह्यात वातावरण बदलामुळे विविध आजारांचा विळखा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला असताना कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. मागील दीड महिन्यात जिल्ह्यात ३८ कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

Amravati News
Dharashiv News : पार्किंगचे पैसे न दिल्याने मोटरसायकलवरील महिलेची ओढणी ओढली; रामलिंग तीर्थक्षेत्र येथील धक्कादायक प्रकार

पावसाळा सुरु झाल्यापासून अमरावती (Amravati) शहरासह जिल्ह्यात साथरोगांचा फैलास मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रामुख्याने डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात मागील १४ दिवसात ८८ डेंग्यूचे रुग्ण, तर ५८ चिकनगुणियाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षण असलेली शेकडो रुग्ण खंगली रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. 

Amravati News
Dhule Heavy Rain : धुळ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; मध्यरात्रीपासून संततधार

जिल्ह्यात कोरोनाही वाढतोय 

अमरावती जिल्ह्यात (Dengue) डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत असण्यासोबतच कोरोनाचे (Corona) रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्यात धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३७ कोरोना रुग्णापैकी २५ रुग्ण हे महानगरपालिका क्षेत्रातील तर १२ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यामुळे नागरिकांना कोणतेही लक्षण असल्यास त्यांनी तातडीने तपासणी करावी असं आवाहन करण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com