Amravati News: संतापजनक! अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, ४ आरोपींना अटक

Minor Girl Physical Abused By Gang In Chandur Railway Police Station Area: अमरावतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आलीय.
अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
Amravati NewsSaam Tv

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

अमरावतीमधून सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. अमरावतीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालाय. या भयंकर घटनेनं शहर हादरलं आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली.

पिडीतेस जिवे मारण्याचा प्रयत्न

पीडितेवर तोंडात, डोळ्यात रेती टाकून अत्याचार झाला असल्याची माहिती समोर (Amravati News) आलीय. तर पिडीतेस जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची देखील माहिती मिळत आहेत. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पॉस्को आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले (Crime News) आहेत. चार आरोपींना अटक देखील अमरावती पोलिसांनी केलीय. त्यांना न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अकोल्यातील धक्कादायक घटना

अकोल्यात देखील दोन दिवसापूर्वी असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमधील ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली (Minor Girl Physical Abused) होती. या प्रकरणात शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाल संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला होता.

अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
Dog Abuse in Kolkata : संतापजनक! 60 वर्षीय आजोबांचं किळसवाणं कृत्य; पाळीव कुत्रा घरात एकटा असल्याचं पाहून केलं...VIDEO VIRAL

ही घटना ४ जून रोजी घडली होती. या घटनेनंतर चिमुकली भयभीत झाली अन् सलग दोन दिवस तिने शाळेला दांडी मारली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आली (Chandur Railway Police Station Area) होती. सद्यस्थितीत या प्रकरणात सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. याप्रकरणी देखील पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय. जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला गेलाय.

अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com