Amol Mitkari News : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनुसार चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला होता. विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिटकरी म्हणाले, आता गृहखात्याचा गैरवापर होत असून पोलिसांकडून विद्याताईंवर कारवाई केल्याचं समजते'. आता मोहित कंबोज यांना राष्ट्रवादीवर बोलण्यासाठी संरक्षण मिळते का ? असा प्रश्नही आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. मोहित कंबोज ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे,त्यानं मला 'जय श्रीराम'केलंय तर मी देखील त्याला 'हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली,जय सियाराम' असं म्हणत उत्तर दिलं होतं, असं विधान चव्हाण यांनी केल्यावर राजकीय वातावरण तापलं होतं.
'आम्ही प्रभू रामचंद्रांच्या आधी सितामय्याचं नाव घेतो,कारण आम्ही सच्चे हिंदू आहोत,आमचं हिंदुत्व ढोंगी नाही,त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे,असं म्हणत विद्या चव्हाण यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.