PM Modi: अमेरिकन रस्त्यावर, भारतातही जनक्षोभ? मोदींच्या कार्यकाळाबाबत राऊतांचा इशारा

MP Sanjay Raut : पंतप्रधान मोदींविरोधातही भारतातील जनता निदर्शने करेल. त्यामुळे मोदी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील यात शंका असल्याचं संजय राऊत म्हणालेत.
PM Modi
MP Sanjay Raut
Published On

ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात अमेरिकन लोक रस्त्यावर उतरलेत..तर भारतातही अमेरिकेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते? एवढंच नाही तर मोदी कार्यकाळ पूर्ण करतील, याबाबत संजय राऊतांनी शंका उपस्थित केलीय.. त्याला कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

हा भडका आहे महासत्ता असलेल्या अमेरिकेतील रस्त्यांवरचा.४ जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेच्या 50 राज्यातील जनता रस्त्यावर उतरलीय. हाच धागा पकडत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय.अमेरिकेप्रमाणेच भारतातही जनक्षोभ उसळण्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केलीय. तर राऊतांच्या विधानावर भाजपने मात्र सडकून टीका केलीय..

डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार स्थापन होऊन 100 दिवसही पूर्ण झाले नाहीत.. तोच अमेरिकेत जनक्षोभ उसळलाय.. हुकूमशाही आणि मनमानी पद्धतीने सुरु असलेला कारभार, नोकरकपात, बंद करण्यात आलेले सरकारी विभाग, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि आर्थिक घसरण यामुळे अमेरिकन जनता रस्त्यावर उतरलीय. मात्र भारतात मोदींविरोधात असंतोष उफाळून येऊ शकतो? पाहूयात.

भारतातही जनक्षोभ उसळणार?

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

वाढती बेरोजगारी तरुणांमध्ये सरकारविरोधात संताप

सरकारकडून उद्योगपती धार्जिणे धोरण आखले जात असल्याची मध्यमवर्गीयांची भावना

धार्मिक धृवीकरणामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका

केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार संघर्षामुळे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता

अमेरिकेच्या टॅरिफमुळे वाढती महागाई असंतोषास कारणीभूत ठरू शकते.

लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला 2014 आणि 2019 प्रमाणे स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यातच आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर मोदी सरकार उभं आहे.. त्यापार्श्वभुमीवर जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशांतर्गत आंदोलनं उसळल्यास त्याचा फटका मोदी सरकारला बसण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 26 टक्के टॅरिफ असो की महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या मुद्द्यांवर मोदी सरकार कशी रणनीती आखणार? त्यावरच सरकार टिकणार की गडगडणार हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com