अंबादास दानवेंचा ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र?बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरेसेनेला गळती लागल्यानंतर आता ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा सुरु झालीय... मात्र दानवे खरचं उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?
Shiv Sena leaders Ambadas Danve and Sanjay Shirsat seen together during the Republic Day event at Devgiri Ground, sparking political speculation.
Shiv Sena leaders Ambadas Danve and Sanjay Shirsat seen together during the Republic Day event at Devgiri Ground, sparking political speculation.Saam Tv
Published On

शिवसेनेच्या फुटीनंतर एकमेंकावर तुटून पडणारे शिंदेसेना आणि ठाकरेसेनेचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र आले... छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी मैदानावर हे चित्र पहायलं मिळालं. माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट एकाच रांगेत बसले होते... इतकचं काय तर कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी एकमेंकांशी हस्तांदोलन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या....एकीकडे हस्तांदोलन होत असताना दुसरीकडे ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे लवकरच शिंदेसेनेत पक्षप्रवेश करतील, असं खळबळजनक विधान मंत्री उदय सामंतांनी केलयं...

ठाकरेसेनेचे अंबादास दानवे साथ सोडणार असल्याची चर्चा अचानक का सुरु झाली?

लोकसभा निवडणुकीच्या तिकिट वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात शीतयुद्ध झालं...खैरे यांना उमेदवारी मिळाल्याने दानवे नाराज असल्याची चर्चा होती. संभाजीनगरमध्ये ठाकरेसेनेला महापालिका निवडणुकीत फक्त 6 जागा मिळाल्यानं खैरे दानवे पुन्हा आमनेसामने... महापालिकेतील पराभवानंतर चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर सेटींग केल्याचा आरोप करत पराभवाचं खापर फोडलं... त्यामुळे पक्षांतर्गत कोंडी होत असल्यानं दानवे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण...

अंबादास दानवेंनी मात्र उदय सामंतांचा दावा खोडून काढलाय....

2024 मधली लोकसभा त्यानंतरच्या विधानसभा, नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदही अंबादास दानवेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली... जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांना मागे टाकत अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलयं...राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आमदार असलेल्या अंबादास दानवेंना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी ही मिळालीय... त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांचा अंबादास दानवे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.. तर दुसरीकडे विरोधकांकडून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना हवा दिली जात आहे. मात्र सामंतांच्या दाव्यानुसार दानवे ठाकरेंची साथ भविष्यात खरच सोडणार का? की आपली पक्षनिष्ठा कायम राखणार याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com