कैलास चौधरी
उस्मानाबाद : सध्याच्या कलयुगात काय होईल याचा काही अंदाज नाही. असा एक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशिम या ठिकाणी घडला आहे. शहरानजीक असलेल्या एका शेतात आकाशातून सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी शेतकरी आपल्या शेतीमध्ये काम करत असतानाच अचानक आकाशातून एक दगड खाली पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
हे देखील पहा-
या बातमीमुळे सोशल मीडियावरही तुफान चर्चा रंगत आहे. हा दगड काही साधासुधा नसून चक्क सोनेरी रंगाचा दगड असल्याचे समोर दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दगड २ किलो वजनाचा असून सोनेरी रंगाचा आहे. शेतकरी ज्या ठिकाणी काम करत होता. तिथून अवघ्या ७ ते ८ फुटांवर हा दगड पडला आहे. यामुळे शेतकरी थोडक्यात बचावला असेच म्हणता येईल. ही घटना घडल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे.
तर सध्या हा दगड तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. निवृत्त माळी असे शेतकऱ्याचे नाव असून, माळी आपल्या शेतात काम करत असताना ही घटना घडली. खरेतर, उस्मानाबाद मध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे शेतीची पाहणी करण्याकरिता गेले होते. माळी यांच्यासोबत ही घटना घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे माळी खूप घाबरले होते. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या दगडाची प्राथमिक तपासणी सुरू असून भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तर यातून हा उल्कापात असल्याची माहिती भूवैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. दगडाचं वर्णन करायचे झाले तर याची ७ इंच याची लांबी असून ६ इंच रुंदी आहे. तर वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याची जाडी साडेतीन इंचापेक्षा जास्त आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.