Gram panchayat Election: सरपंच पदासाठी चिन्ह सांगितले खटारा, उमेदवारांने ऐकले खराटा अन्‌ केला प्रचार; मतदानाच्‍या दिवशी झाले भलतेच

सरपंच पदासाठी चिन्ह सांगितले खटारा, उमेदवारांने ऐकले खराटा अन्‌ केला प्रचार; मतदानाच्‍या दिवशी झाले भलतेच
Gram panchayat Election
Gram panchayat ElectionSaam tv

अमर घटारे

अमरावती : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही गंमती जंमती होत असतात. असाच प्रकार (Melghat) मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) झाला. मात्र या प्रकारामुळे सरपंच पदासाठी उभ्‍या असलेल्‍या उमेदवाराचे निकालापुर्वीच सरपंच होण्याचे स्‍वप्‍न भंगले आहे. (Letest Marathi News)

Gram panchayat Election
Shirdi News: तासन्‌तास दर्शनरांगेत उभे राहण्यापासून साईभक्तांची होणार सुटका; साई संस्थानकडून यासाठी १०९ कोटी रुपये खर्च

अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Election News) रविवारी मतदान पार पडले. यामध्ये मेळघाटातील एका सरपंच पदाच्या उमेदवाराला त्याचे बोधचिन्ह खटारा म्हणजे बैलबंडी सांगण्यात आले होते. मात्र उमेदवाराने खराटा ऐकून संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात त्याने आपला प्रचार खराटा या चिन्हाने केला. हा संपूर्ण प्रकार मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत निवडणुकीत घडला असून या निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे असलेले चिंतामण चंदन बेठेकर यांच्या सोबत झाला.

मतदानाला गेले अन्‌ खराटाच गायब

मतदानाच्या दिवशी (EVM) इव्‍हीएम बॅलेटवर खराटा सोडून खटारा म्हणजे (बैलबंडी) दिसली आणि सरपंच पदाच्या उमेदवाराचा चर्चेत "ध चा म" झाला. ते जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना मशीनच्या बॅलेटवर आपले चिन्ह दिसले नसल्याने ते चकित झाले. यामुळे त्यांच्या सरपंच होण्याच्या स्वप्नाचा पूर्ण चुराडा झाला. मात्र त्यांनी आज तहसीलदाराकडे तक्रार करून निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com