Dengue Fever : अमरावती शहरात आढळले डेंग्यूचे पाच रुग्ण

अमरावती शहरात आढळले डेंग्यूचे पाच रुग्ण
Dengue Fever
Dengue FeverSaam tv
Published On

अमर घटारे

अमरावती : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिका क्षेत्रात डेंग्यूचा प्रभाव दिसून येत आहे. यात सात संशयीत (Dengue) रूग्णांपैकी तब्बल पाच रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन (Amaravati) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Dengue Fever
Leopard Attack: माकडाची शिकार करायला बिबट्या चढला झाडावर; बिबट्याचाच झाला मृत्यू

गत आठवड्यात बडनेरामध्ये (Badnera) दोन संशयित रुग्ण आढळले होते. यानंतर अमरावती शहरातही पुन्हा डेंग्यूचे पाच संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने परिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर आता त्यापैकी पाच रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बडनेरा, पवननगर, टोपेनगर, जुनी अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळूप आले आहे.

Dengue Fever
Sambhajinagar News: बालविवाह केलेल्या मुलीचे अडीच महिन्यात टोकाचे पाऊल; पतीनेही महिनाभरापुर्वीच केली आत्महत्या

अशी घ्या काळजी

पाणी साठून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये, याची काळजी घ्यावी. इतर पाणी साठविण्यात येणारी भांडी स्वच्छ करणे आवश्यक आहे. डासांचे निर्मूलन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणेही गरजेचे आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले. या व्यतिरिक्त कुलरमध्ये असलेले पाणी, पावसाळ्यात घराचा छतावर नारळाची करवंटी, टायर व अन्य वस्तूंमध्ये जमा होणारे पाणी तत्काळ फेकून देण्यात यावे, एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com