कुत्रं भुकलं तर दगड मारावाच लागतो...

संदेश कार्ले, शिवसेना नेते
संदेश कार्ले, शिवसेना नेते
Published On

अहमदनगर : बाजार समिती राहिली नाही तर तालुक्यातील शेतकरी बसतील कुठे? तालुक्यातील शेतकऱ्यांनी या विरोधात लढा उभारायला हवा. बाजार समितीला (कै.) दादा पाटील शेळके यांचे नाव देऊन तुम्ही त्यांची स्वप्ने पायदळी तुडवीत आहात. आगामी निवडणुकीत मतदारांनी अशा लोकांच्या हाती सत्ता देऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केले.

नगर तालुक्यातील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संचालक मंडळाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे बिनबुडाचे आरोप होत असल्याचे सांगितले. त्यावर आज पुन्हा नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत बाजार समितीच्या संचालकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या. Allegations against former MLA Shivajirao Kardile

संदेश कार्ले, शिवसेना नेते
भंडारदरापाठोपाठ निळवंडे काठोकाठ, प्रवरेला पूर

या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, संदीप गुंड, प्रवीण कोकाटे, रामदास भोर, प्रकाश कुलटे, डॉ. दिलीप पवार, रवींद्र भापकर आदी उपस्थित होते.

कर्डिलेंनी अहवाल दाबला

संदेश कार्ले यांनी समाचार घेतला. सन २०१६ ते २०१८मध्ये लेखा परिक्षण अहवालाचे तक्रारदार आम्ही होतो. या लेखा परिक्षण अहवालाची एक प्रत तक्रारदाराला दिली जाते. त्यात काय ते उघडे पडले आहे. विधान परिषदेच्या पाकीट वाटपात तुम्ही कोठे होता, हे तपासून पहा. तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी सत्तेचा दुरउपयोग करून पणन मंडळाकडून लेखा परिक्षणावर स्थगिती आणली होती.

रात्रीतून अजित पवारांचे पाय धरले

शिवसेना व शिवसैनिक आदेश मानणारे आहेत. रस्त्याने जाताना भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारावाच लागतो. बाजार समितीला नोटीस आल्यावर तुमचे नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले रात्रीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाया पडून आले, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी केला. Allegations against former MLA Shivajirao Kardile

व्याह्यासाठी पक्षाच्या पाठीत खंजीर

बाळासाहेब हराळ म्हणाले, कर्डिले आमदार असताना सूर्यवंशी यांच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला. आम्ही कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. व्याह्यासाठी तुमच्या नेत्याने पक्षविरोधी कारवाया करून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सहाव्या वेतन आयोगाचे कर्मचाऱ्यांचे वेतनही तुम्ही गायब केले. नेप्ती उपबाजार समितीतील डाळिंब शेडची जागा 80 लाख रूपयांना विकली असल्याचा आरोपही हराळ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com