महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचा पुढाकार

महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महिला बचत गटांना व्यवसाय करण्याचे हक्काचे ठिकाण मिळाले आहे.
महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचा पुढाकार
महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचा पुढाकारराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर,रायगड

रायगड: अलिबाग शहरातील महिलांना स्वयंपूर्ण आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने पावले उचलली आहेत. शहरातील महिला बचत गटांना हक्काचे व्यवसायाचे ठिकाण अलिबाग नगरपरिषदेने उपलब्ध करून दिले आहे. शहरातील जुन्या नगरपरिषद कार्यालयासमोर असलेल्या नगरिपरिषदेच्या मालकीच्या जागेत सुसज्ज आणि आकर्षक उपजीविका केंद्राचा लोकार्पण सोहळा आज रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे शहरातील महिला बचत गट हे आळीपाळीने याठिकाणी आपला व्यवसाय करू शकणार आहेत. (Alibag Municipal Council's initiative to make women self-sufficient)

हे देखील पहा -

अलिबाग हा पर्यटन तालुका आहे. अलिबागला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा, नैसर्गिक सौन्दर्य, नारळी फोफळीच्या बागा यामुळे अलिबागेत पर्यटकांचा नेहमी राबता असतो. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनाही व्यवसाय मिळत असतो. अलिबाग शहरात 24 महिला बचत गट असून त्यांना हक्काचे व्यवसाय करण्यासाठी ठिकाण मिळावे यासाठी नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून उपजीविका केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यामुके अलिबागमधील महिला बचत गट हे आपला विविध व्यवसाय एका छताखाली करणार आहेत. अलिबाग नगरपरिषदेने महिला सक्षमीकरण बाबत उचलले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचा पुढाकार
Ayran Khan Case: नवाब मलिकांनी उघड केली 'ती' तीन नावं, NCB वर केले गंभीर आरोप

या उदघाटन सोहळ्याला नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ऍड मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, नगरसेवक अजय झुंझाराराव, नगरसेवक ऍड गौतम पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com