Alibag : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौल रामेश्वर मंदिर उजळले रोषणाईने!
Alibag : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौल रामेश्वर मंदिर उजळले रोषणाईने!राजेश भोस्तेकर

Alibag : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौल रामेश्वर मंदिर उजळले रोषणाईने!

अलिबाग तालुक्यातील चौल या मंदिराच्या ऐतिहासिक गावातील श्री रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published on

-- राजेश भोस्तेकर

रायगड : आज त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला घरात, मंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाते. अलिबाग तालुक्यातील चौल या मंदिराच्या ऐतिहासिक गावातील श्री रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला केलेल्या विद्युत रोषणाईने समोरील पोखरणी मध्ये प्रतिबिंब पडले आहे. श्री रामेश्वर मंदिरात केलेली ही विद्युत रोषणाई पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

हे देखील पहा :

अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा या गावांना मंदिराची गावे म्हणतात. या परिसरात साधारण साडे तीनशे मंदिरे आहेत. चौल गावातही अनेक आकर्षक आणि पुरातन मंदिर आहेत. यापैकी महादेवाचे श्री रामेश्वर हे हेमाडपंथीय मंदिर आहे. मंदिरासमोर पोखरण आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला श्री रामेश्वर मंदिरात रोषणाई केली जाते.

Alibag : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चौल रामेश्वर मंदिर उजळले रोषणाईने!
Viral Video : राजस्थानमध्ये महिलेच्या अंगावर JCB चढवून ठार मारण्याचा प्रयत्न!

पूर्वी दिव्यांनी हे मंदिर लखलखाटात न्हाहून निघायचे. मात्र, आता विजेची रोषणाई मंदिरावर केली जाते. विद्युत रोषणाई मंदिरावर आणि पोखरण परिसरात केल्याने मंदिर हे अजून खुलन दिसते. समोरील पोखरणीत विद्युत रोषणाईची प्रतिछाया पडत असल्याने एक वेगळाच अनुभव नागरिकांना पाहायला मिळतो. त्यामुळे ही विद्युत रोषणाई पाहण्यास मोठ्या संख्येने नागरिक श्री रामेश्वर मंदिरात गर्दी करीत असतात.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com