Alcohol Price Hike: उत्पादन शुल्कात भरमसाठ वाढ, 'विदेशी' महागली, तळीरामांच्या देशीवर उड्या

Alcohol Price Hike News: देशभरात दारुची मागणी प्रचंड वाढली आहे. दारुची मागणी काही जिल्ह्यात वाढली आहेत तर काही जिल्ह्यात कमी झाले आहेत.
Alcohol Price Hike
Alcohol Price HikeSaam Tv
Published On
Summary

दारुच्या किंमती वाढल्या आहेत

उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने हे दर वाढले आहेत

देशी दारुच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत

राज्यात विदेशी दारू महागल्यानं देशी दारूची मागणी वाढलीय. राज्य उत्पादन विभागाच्या आकडेवारीत वाढ आणि घट समोर आलीय. नेमकं देशी दारुची मागणी किती वाढलीय? कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त वाढ झाली आहे. सर्वात जास्त दारुची मागणी कोणत्या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात दारुची मागणी कमी झाली आहे हे जाणून घ्या.

'विदेशी' महागल्याने 'देशी'ला मागणी

राज्याच्या मद्यविक्रीत 7 टक्के वाढ

बाजारात देशी दारुचे नवे ब्रँड्स

राज्यातल्या तळीरामांना सध्या मोह पडलाय तो देशीचा...देशीच्या मोहापायी त्यांनी विदेशीला दूर केलंय...आणि त्याचं कारण आहे..विदेशीच्या खिशाला न परवडणाऱ्या किंमती...तळीरामाच्या या देशीप्रेमापोटी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशी दारूच्या विक्रीत तब्बल सात टक्क्यांची वाढ झालीय..राज्य सरकारने उत्पादन शुल्कात भरमसाठ वाढ केलीय त्यामुळे आतापर्यंत केवळ विदेशी दारू खरेदी करणारे ग्राहकही देशी दारूची मागणी करतायत. त्यामुळे देशी दारूच्या मागणीची विक्री किती वाढली आहे.

Alcohol Price Hike
Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

‘विदेशी’ महागल्याने ‘देशी’ला मागणी

एप्रिल ते जून महिन्यात 1 लाख 70 हजार लिटर देशी दारूची विक्री झाली आहे. एका वर्षात देशी दारूच्या विक्रीत 70 हजार लिटरने वाढ झाली आहे.

दरम्यान राज्य उत्पादन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार वाशिम,भंडारा,पालघर,रायगड,सोलापूर,नंदूरबार या जिल्ह्यात दारू विक्रीत वाढ झालेली आहे. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यातल्या दारू विक्रीत घट झालीय.

दारू विक्री वाढलेले जिल्हे

वाशिम- 10.65 टक्के

भंडारा-11.93 टक्के

पालघर- 12.26 टक्के

रायगड-13.83 टक्के

सोलापूर- 33.75 टक्के

नंदूरबार- 35.61 टक्क

दारू विक्री घटलेले जिल्हे

सिंधूदुर्ग- 2.74 टक्के

रत्नागिरी- 2.44 टक्के

कोल्हापूर- 1.76 टक्के

बीड- 0.65 टक्के

Alcohol Price Hike
Solapur To Tirupati Travel: सोलापूरहून तिरुपतीला जाण्यासाठी कसा प्रवास कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

दरम्यान विदेशी दारूच्या किंमती कमी होण्याची शक्यता नसल्यानं देशी दारूच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते. याचाच फायदा घेत बाजारपेठेत नवीन देशी ब्रँड्सही दाखल झालेत. त्यामुळे 'परवडणारा पर्याय' म्हणून तळीरामांच्या देशीवर उड्या पडणार, हे निश्चित.

Alcohol Price Hike
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज फक्त ३४० रुपये गुंतवा अन् ७ लाख मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com