दुधाचा कॅन उघडताच सुटला दारूचा घमघमाट; दूधवाल्याचा अनोखा फंडा!

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील दूध विक्रीच्या व्यावसायिकाने मोटारसायकलवरून चक्क दुधाच्या कॅनमधूनच देशी, विदेशी दारूचे खंबे आणले.
दुधाचा कॅन उघडताच सुटला दारूचा घमघमाट; दूधवाल्याचा अनोखा फंडा!
दुधाचा कॅन उघडताच सुटला दारूचा घमघमाट; दूधवाल्याचा अनोखा फंडा!विश्वभूषण लिमये
Published On

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूर Solapur जिल्ह्यातील मोहोळ Mohol तालुक्यातील वाघोली येथील दूध विक्रीच्या व्यावसायिकाने मोटारसायकलवरून चक्क दुधाच्या कॅनमधूनच देशी, विदेशी दारूचे खंबे आणले आणि सोलापूर-कोल्हापूर Solapur-Kolhapur महामार्गावर रंगेहाथ पोलिसांच्या Police हाती पडला.

हे देखील पहा-

कामती पोलिसांनी या दूधवाल्याविरुद्ध आता गुन्हा नोंद केला आहे. दत्तात्रय विश्वनाथ पाटील असे या दूधवाल्याचे नाव आहे. तो दररोज सोलापूर ला ये-जा करीत होता.

पोलीस सूत्रांनुसार, दत्तात्रय पाटील हा एम. एच.13 डी. के. 2199 या मोटारसायकलला दुधाचे कॅन अडकवून देशी आणि विदेशी दारू बेकायदेशीररित्या आणि विना परवाना विक्रीसाठी घेऊन जातो. अशी माहिती हवालदार जिवराज कसवीद यांना मिळाली होती.

दुधाचा कॅन उघडताच सुटला दारूचा घमघमाट; दूधवाल्याचा अनोखा फंडा!
Crime: ‘कार हळू चालव’ म्हटल्याने रागाच्या भरात मारहाण; एकाचा मृत्यू!

त्यानुसार त्यांनी महामार्गावर पेट्रोलिंग Patrolling करत असताना, त्यांनी संशयित गाडी थांबवून चौकशी केली. दुधाचे कॅन उघडून पहिले असता, त्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या देशी आणि विदेशी दारूच्या एकुण 55 बाटल्या आढळून आल्या!

हा दूधवाला वाघोली Wagholi येथून शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते सोलापूर Solapur येथे विक्रीसाठी रोज जात असे. गुरुवारी त्याने येताना सोलापूर येथून देशी-विदेशी दारूचे खंबे विकत घेतले. त्यानंतर त्याने चक्क दुधाच्या रिकाम्या कॅनमध्ये Empty Can ते सर्व ठेवले आणि वाघोलीच्या दिशेने येत होता. दुधवाल्याची ही माहिती पोलिसांना मिळाली. अश्याप्रकारे दुधाचा व्यवसाय करणारा तो चक्क दारूच्या बाटल्यांसह शिस्तीत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

दरम्यान दारू, कॅन, मोटारसायकल असा एकुण 24 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी दूधवाल्याकडून जप्त केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com