अक्षय गवळी, अकोला
अकोल्यातून तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी हाती आली आहे. गेल्या दोन दिवसांत तुरीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी 10 हजार 525 रूपये असा तुरीला कमाल भाव होता. आता तुरीचा भाव 385 रुपयांनी क्विंटलमागे घसरला आहे. त्यामुळे तुरीचे कमाल भाव 10 हजार 140 रूपये क्विंटलवर पोहचले. तुरीची घसरणीचा भाव पाहता त्याचा परिणाम बाजारातील आवक वरही झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा शेतमाल घरात साठवून ठेवणं पसंत केलं आहे. (Latest Marathi News)
12 फ्रेब्रुवारी रोजी तुरीला 8 हजार 100 पासून जास्तीत जास्त 10 हजार 525 रूपये एवढा प्रतिक्विंटलप्रमाणे भाव होता. तर सरासरी भाव 9 हजार 600 रूपये इतका सरासरी भाव आणि आवक 2 हजार 118 एवढी क्विंटल झाली होती.
आता तुरीच्या कमाल दरात 385 रुपयांनी आणि किमान भावात 600 रूपयांनी घसरण क्विंटलमागे घसरण झाली आहे. त्यामुळे तुरीचे किमान भाव 7 हजार 600 तर कमाल भाव 8 हजार 140 वर पोहचले. बाजार समितीचे घसरणीचे चित्र पाहता आवक कमी झाली आहे. आज 14 फ्रेब्रुवारी रोजी 848 क्विंटल एवढी तूर खरेदी झाली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात सर्वच बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम होती. मात्र या सोमवारपासून तुरीचे खाली आले आहे. देशातील तूर उत्पादन घटल्यानं परिणामी तुरीची विक्री कमी होताना दिसत आहेत. सद्यस्थित तुरीची मागणी जरी जास्त असली त्या तुलनेत बाजारातील तूर आवक कमी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.