Narayan Maharaj Tarale Death : ज्येष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं निधन; ऐन आषाढ महिन्यात वारकऱ्यांवर शोककळा

Narayan Maharaj Tarale Death News : ज्येष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनाने ऐन आषाढ महिन्यात वारकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
Narayan Maharaj Tarale Death News
Narayan Maharaj Tarale DeathSaam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना विठुरायांच्या भेटीची ओढ लागली आहे. विठुरायांच्या दर्शनासाठी शेकडो दिंड्या पंढरीकडे चालत निघाल्या आहेत. ऊन आणि पावसाची पर्वा न करता विठरुयांचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरकडे वळाली आहे. याचदरम्यान अकोल्यातील ज्येष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं निधन झालं आहे. तराळे यांच्या निधनाने वारकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Narayan Maharaj Tarale Death News
Maharashra Politics : उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा हादरा; विदर्भातील दिग्गज नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला

अकोला जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. तराळे हे मृत्यूसमयी 98 वर्षांचे होते. तराळे यांनी बाळापूर तालुक्यातील व्याळा गावी अखेरचा श्वास घेतकला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्यांनी 60 वर्ष सलगपणे पंढरीची वारी केली.

Narayan Maharaj Tarale Death News
Pune Crime News : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच; मध्यरात्री घरांवर हल्ला, दरवाजांची तोडफोड

तराळे यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कीर्तनातून वारकरी संप्रदायाची सेवा केली. नारायण महाराज तराळे हे वारकरी संप्रदायातील 'विरह अभंग' खूप प्रसिद्ध आहेत. तराळे यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता व्याळा या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण राज्यातून उद्या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वारकरी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com