Akola News: पिवळ्या दिव्याची कार, ऐटीत फिरायचे; अकोल्यात 'स्पेशल 26' टोळीचा पर्दाफाश, उघड झाली धक्कादायक बाब

Akola Crime News: चार जणांनी पिवळ्या दिव्याची कार घेऊन कारवाईचा धाक दाखवून अनेकांची लुबाडणूक केली.
Akola Fake NCB Officer News
Akola Fake NCB Officer Newssaam tv

>> जयेश गावंडे, अकोला

Akola Fake NCB Officer News: अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या काही गावांमध्ये एनसीबी अधिकारी असल्याचे भासवून चार जणांनी अनेकांना लुटल्याची घटना समोर आली आहे. पिवळ्या दिव्याची कार घेऊन फिरणाऱ्या आणि कारवाईचा धाक दाखवून अनेकांची लुबाडणूक करणाऱ्या चार जणांना दहीहांडा पोलिसांनी अटक केली आहे. या तोतया अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी पिवळ्या दिव्याची कार जप्त केली आहे.

अकोल्यातील अकोट तालुक्यात चार युवक नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांना लुटत असल्याची माहिती दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी मुंबई एनसीबी कार्यालयात संपर्क साधून चौकशी केली तेव्हा असे कोणतेही अधिकारी नसल्याचे एनसीबीने सांगितले. यांतर दहीहंडा पोलिसांनी सापळा रचून या चार युवकांना ताब्यात घेतले.

Akola Fake NCB Officer News
Rahul Gandhi Video : माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत - राहुल गांधी

मिळालेल्या माहितीनुसार, चोहोट्टा बाजार येथील नदीम शाह महेबूब शाह हा तोतया नार्कोटिक्स अधिकारी म्हणून वावरत होता. त्याच्यासोबत त्याचे अचलपूर येथील नातवाईक एजाज शाह रहमान शाह, मोहसिक शाह महेमूद शाह, आसिक शाह बशीर शाह हे त्याला सहकार्य करायचे.

ही चार जणांची टोळी ग्रामीण भागात अधिकाऱ्याच्या थाटात फिरायची आणि लोकांना धाक दाखवून त्यांची तपासणी करायची. तसेच व्यवहात त्रुटी दाखवून दंड आकारण्याची धमकी द्यायचे आणि तडजोड करून रक्कम उकळायचे असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे अनेक बनावट कागदपत्रे, स्टॅम्प, व्हिजिटिंग कार्ड असे कागदपत्रे आढळून आले. (Latest Marthi News)

Akola Fake NCB Officer News
Crime News: क्रूरतेचा कळस! जमिनीच्या तुकड्याचा वाद, 8 वर्षीय निष्पाप चिमुकलीची गोळ्या झाडून हत्या; रात्रीचे घरात शिरले अन्...

नदीम शाह हा चारचाकी वाहन, त्यावर फिरत्या पथकाचा स्टिकर लावून अधिकारी म्हणून वावरायचा. त्याने ऐयाझ शेख, असिफ शाह आणि मोहीम शेख यांच्यासोबत मिळून अनेकांना लुटले आहे. या चौंघांनी किती लोकांना फसवले हे आता पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे. (Akola News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com