Poshan Aahar : कीड लागलेली, मुदतबाह्य पोषण आहार; अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ

Akola News : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे हा प्रकार उजेडात आलाय. दरम्यान कालच बोरगाव मंजू येथील १७ अंगणवाडीमध्ये लहान बालकांचा पोषण आहार वितरित करण्यात आला
Poshan Aahar
Poshan AaharSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. अंगणवाडीतील लहान बालकांसह गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार हा कीड लागलेला आहे. तर काही पोषण आहाराचे पाकीट मुदत संपलेली असल्याचे देखील आढळून आली आहे.  

अकोला (Akola) जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे हा प्रकार उजेडात आलाय. दरम्यान कालच बोरगाव मंजू येथील १७ अंगणवाडीमध्ये लहान बालकांचा पोषण आहार वितरित करण्यात आला. मात्र, हा पोषण आहार (Poshan Aahar) कीड लागलेला असल्याचं समोर आलं. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर हा मुद्दा आज अकोला पंचायत समितीच्या सभागृहात चांगलाच गाजला. पंचायत समिती सदस्य तथा ठाकरे गटाचे गटनेते भरत बोरे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत सभागृहात कीड लागलेली मुगाची डाळ टेबलावर टाकली. 

Poshan Aahar
Jalgaon News : दोनच दिवसांपूर्वी घरून परतला; विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

यामध्ये कीड लागलेली खिचडी मसाला तांदूळ आणि बालकांना 3 वर्षापर्यत दिल्या जाणारं प्रोटीन हे एक्सपायरी असल्याचं समोर आलं. दरम्यान अंगणवाडीतील पोषण आहार वाटप प्रक्रिया थांबण्यात यावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी; अशी मागणी बोरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी या पोषण आहाराचा घरोघरी वाटप करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com