Akola News : पीक विम्यावरून आमदार नितीन देशमुख आक्रमक; डीपीडीसी बैठकीवर टाकला बहिष्कार

Akola News : एचडीएफसी अर्गो कंपनीने २०२३-२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला मागणी करूनही सादर केली नाही.
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी बहिष्कार टाकला. आमदार देशमुख हे डीपीडीसीच्या बैठकीत पिक विमा मुद्द्यावरुन चांगलेचं आक्रमक झाले अन् बैठक मध्येच सोडत सभागृहाच्या बाहेर पडले.

Akola News
Naigaon Crime : एटीएम फोडून ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास; नायगावमधील घटना

एचडीएफसी अर्गो कंपनीने २०२३-२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी (Crop Insurance) पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला मागणी करूनही सादर केली नाही. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची लदावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी, पात्र आणि अपात्र यांची यादी, खरीप आणि रब्बी पंचनामे प्रती इतर दस्ताऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाहीत. यामूळे बाळापूर तालुक्यातील ७ हजार ५५६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नाही. यामुळे सदर कंपनीवर बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच मुद्द्यावरून आमदार देशमुख (Nitin Deshmukh) हे आक्रमक झाले होते. 

Akola News
Dhamani Dam: धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले; पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

दरम्यान (Akola) अकोला जिल्ह्याची डीपीडीसीची बैठक होती. या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील हे अकोल्यात दाखल असलेल्या विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे प्रकरणावर काहीही बोलायला तयार नाही. पोलिस अधिक्षक देखील बैठकीत गप्प आहे. त्यामुळे डीपीडीसी बैठकीवर बहिष्कार टाकत असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर फसवणुकीचे गुन्हे आहेत. तरीही पालकमंत्री चौकशीचे आदेश देत नाहीत. यामुळे बैठकीतून बाहेर जावं लागलं असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com