Akola News: वाह रे पठ्ठ्या! खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी, पण शिक्षणाचा ध्यास; वयाच्या ३८ व्या वर्षी झाला दहावी पास, प्रेरणादायी कहाणी

10th Student Success Story: अकोला जिल्ह्यात एका व्यक्तीने वयाच्या ३८ व्या वर्षी दहावी पास केली आहे. आता त्याने पत्नीला देखील शिकवण्याचा निर्धार केला आहे.
वयाच्या ३८ व्या वर्षी दहावी पास केली
10th Student Success Story Saam Tv

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक होताना आपण पाहिलंय. मात्र, २००१ मध्ये नववीत सर्वच विषयात नापास झाल्यावरही जिद्द न सोडता २२ वर्षानंतर पठ्ठ्यानं नववीत प्रवेश घेतला आणि पासही झाला. पुढं दहावीत गेला, आणि आता दहावीत त्याने बाजी मारली आहे. वयाच्या ३८व्या वर्षी दहावी गाठणाऱ्या व्यक्तीचं सध्या अकोला जिल्ह्याच कौतुक होत आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील पाहिलेचा दहावी पास झाल्याचा मानही त्याने मिळवला आहे. अकोला शहरातल्या रतनलाल प्लॉट भागात राहणाऱ्या गजानन गवई नावाच्या व्यक्तीची ही सक्सेस स्टोरी आहे.

अकोला (Akola News) शहरातल्या तुकाराम चौकात चायनीज खाद्यपदार्थांची गाडी चालवणारे गजानन प्रकाश गवई यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं. मागील काळात घरच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं होतं. मात्र, वयाच्या ३७व्या वर्षी त्यांनी शिक्षणाची वाट धरली. ३८ वर्षाचे गजानन गवई यांनी काल दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

रतनलाल प्लॉट येथे राहणारे गवई चार वर्षांपासून तुकाराम चौकात चायनीजचे दुकान लावतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दुकानात काम करताना शिक्षण घेणाऱ्या मुलांसोबत त्यांचं बोलणं (10th Student Success Story) व्हायचं. आपले मुलंही त्यांच्याप्रमाणं शिकावी, असा विचार एके दिवशी त्यांच्या मनात आला. पण घरी सर्व अशिक्षित होते. आपण शिकलो नाहीतर तर मुलांना प्रेरणा कुठून मिळणार? त्यांना मार्गदर्शन कोण करणार? या अस्वस्थ प्रश्नातून गजानन गवई यांनी जागृती रात्रशाळेत प्रवेश मिळवला अन् नववी परीक्षा उत्तीर्ण केली.

गजानन गवई हे सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यत डॉ. नरेंद्र सरदेसाई यांच्या रुग्णालयात काम करायचे. त्यानंतर १२ ते दुपारी २ वाजेपर्यत डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्या पॅथॉलॉजी लॅबवर साफसफाईचे काम (Student Success Story) करायचे. पुढं बाजारात जाऊन भाजीपाला तसेच इतर सामान खरेदी करत सायंकाळी तुकाराम चौकात चायनीजचे खाद्यपदार्थ विकायचे, अशा दिनक्रमात रात्र शाळेचे वर्ग त्यांनी केले.

वयाच्या ३८ व्या वर्षी दहावी पास केली
Naxalist Diwakar 10th Pass: 'एके ४७' सोडून पेन हाती घेतला, नक्षलवादी दिवाकर झाला १० वी पास; तब्बल १४ लाखाचं होतं बक्षीस!

गवई यांनी असंख्य चटके सहन केलेत. हरायचं नाही, अशी जिद्द कायम बाळगली. दहावीची परीक्षा देताना भीती मनात होती. मात्र, शालेय मुख्याध्यापक सचिन लोखंडे यांनी वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचं मनोबलही (10th Exam) वाढलं. आज दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद शब्दात न मावणारा असल्याचं ते म्हटले आहेत. विशेष म्हणजे दहावीचा अभ्यास त्यांनी पहाटे पाच वाजता उठून तर कधी कामाच्या रिकाम्या वेळेत केला आहे. गजानन गवई यांचे वडील प्रकाश गवई याचं आठवीपर्यंत शिक्षण झालं आहे. आई शांताबाई कधी शाळेत गेल्याच नाही. त्यांना आणखी १ भाऊ आणि २ बहिणी आहेत. त्यापैकी सूरज गवई अन् सर्वात मोठी बहिण संध्या गवई (कंकाळ), लहान बहिण निशा गवई (डागर) हे तिघेही दहावी नापास आहे. त्यात पत्नी सोनू गवई पाचवीपर्यंत शिकलेली आहे. गवई यांचे मुलं सध्या लहान आहेत. सर्वात मोठी मुलगी आठव्या वर्गात शिकत आहे.

गजानन गवई यांनी परिश्रमातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एक सुजाण पालक म्हणून आपण आपल्या मुलांचं जीवन घडवावं, असं त्यांचं स्वप्न आहे. म्हणून स्वतः दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता गवई हे आपल्या पत्नी 'सोनू'लाही शाळेमध्ये दाखल करणार आहेत.

वयाच्या ३८ व्या वर्षी दहावी पास केली
10th SSC Result : पोरांपेक्षा पोरीच ठरल्या सरस, गुणवंतांचा टक्काही वाढला; वाचा दहावीच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com