Nylon Manja: कोणाचा पाय तर कोणाचा कापला गळा; मकर संक्रांतीच्या दिवशी एकट्या अकोल्यात घडल्या 'इतक्या' दुर्दैवी घटना

Akola Nylon Manja Incident: अकोल्यात नायलॉन मांजाने महापालिका कर्मचाऱ्याचा गळा कापला गेला. या कर्मचाऱ्याच्या गळ्याला 14 ते 15 टक्के लागले. त्यानंतर एका महिलेच्या पायाला मांजामुळे दुखापत झाली.
Nylon Manja
Akola Nylon Manja IncidentSaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

मकर संक्रांतीच्या उत्सवात पतंगोत्सव उत्साहाने साजरा केला गेला. मात्र याच आनंदाच्या सणावेळी नायलॉन मांजाचा वापर जीवघेणा ठरला. अकोल्यात नायलॉन मांजामुळं एका दुचाकीस्वाराचा गळा कापला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. मांजामुळे दुखापतीच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. तर मांजामुळे मृत्यू होण्याच्या घटना राज्यभरात तीन घडल्या. एकट्या आकोल्यात मांजामुळे जखमी होण्याच्या घटना सहा झाल्या आहेत.

अकोल्यातल्या नेहरू पार्क जवळील NCC कार्यलयाजवळ ही घटना घडली. किरण सोनवणे हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. मांजाचा ताण इतका जबरदस्त होता की, त्यांच्या गळ्याला खोल जखम झाली. यात श्वसन नलिकाही कापली गेली. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना स्थानिकांनी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात नेण्यापर्यत त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान अकोल्यात नायलॉन मांजामुळं दुखापत झाल्याचे ही सहावी घटना घटना घडली. याआधीही एका महिलेचा पाय कापल्या गेल्याने ४५ टाके तिला लागले होते. तर मनपाच्या एका कर्मचाऱ्याचाही गळा कापला गेला. अकोल्यात नायलॉन मांजाने महापालिका कर्मचाऱ्याचा गळा कापला गेला. या कर्मचाऱ्याच्या गळ्याला १४ ते १५ टक्के लागले. अकोला चायना मांजामुळे दुखापत झाल्याची पाचवी घटना समोर आली.

Nylon Manja
Nylon Manja: राज्यात नायलॉन मांजाची दहशत; जीवघेण्या मांजाने महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाक कापलं

जिल्ह्यातल्या आपातापा येथील महानगरपालिकेचा कर्मचारी मंगेश बोपटे हा आपल्या दुचाकीने अकोला येथे असतांना त्याच्या गळ्यामध्ये नायलॉन मांजा अडकल्याने मंगेशचा गळा खोलवर चिरला गेला. ही जखम इतकी खोल होती की त्याला १४ ते १५ टक्के पडले. तर गळ्याच्या बाजूला असलेली नसही डॅमेज झाली असल्याचं डॉक्टरांच सांगणे आहे. तर अशा चायना मांजावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Nylon Manja
Kite flying clashes: मकर संक्रातीच्या दिवशी मोठा राडा; डिजेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्रांनी हल्ला

दरम्यान अकोल्यात चायना मांजामुळे ऐका महिलेचा पाय कापला गेला होता. जवळपास महिलेच्या पायाला ४५ टाके लागले होते. अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे ही घटना घडली होती. कलावती मराठे नामक महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा मांजाने मोठ्या प्रमाणात पाय चिरला गेला होता.

थेट तिच्या पायाला ४५ टाके पडले आहेत. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात नायलॉन मांजाने गळा कापल्याचाही प्रकार समोर आला होता. वडगाव रोठे येथील विश्वजीत रोठे हा 22 वर्षीय युवक नायलॉन मांजाच्या कचाट्यात सापडला होता.दरम्यान विश्वजीत हा दुचाकीने घरी जाताना तेल्हारातील शासकीय विश्रामगृह जवळ विश्वजीत रोठे याच्या गळ्याला चायना मांजा अडकल्याने जखमी झाला होता. दरम्यान, मनपा आणि पोलिस विभाग चायना मांज्यावर कारवाई करत असतांना सर्वीकडे चायना मांजा दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com