अकोला - बाळापूर (Balapur) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडेगाव येथे जावयाने सासूला 160 फूट खोल विहिरीत टाकून तिची हत्या केली होती. हत्येच्या दिवसापासून फरार असलेल्या आरोपी जावयाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घातपात की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत. अकोल्यातील (Akola) बाळापूर पोलीस स्टेशनच्या (Police Station) हद्दीतील वाडेगाव येथील चंद्रकला डाखोरे हिचा जावई विलास बळीराम इंगळे याचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद होत होते. वाद मिटवण्यासाठी सासू चंद्रकला डाखोरे नेहमी प्रयत्न करत होती.
हे देखील पहा -
याच कारणामुळे जावई व सासू यांच्यात वाद होऊन जावई विलास इंगळे याने त्याची सासू चंद्रकला डाखोरे हिला 160 फूट खोल विहिरीत टाकून तिची हत्या केली. हत्येच्या दिवसापासून आरोपी विलास इंगळे हा फरार होता. बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपीचा शोध घेत होती.
अखेर पंधरा दिवसाच्या हत्येनंतर आरोपी विलास इंगळे याचा चांन्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जंगलात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी जावयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर हा घातपात की आत्महत्या हे स्पष्ट होणार. दरम्यान पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस तपास करीत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.