Rasta Roko Andolan : 'या' मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेने सरकारला दिली 17 सप्टेंबरपर्यंतची मुदत

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडीसह सहभाग नोंदवला.
Latur, rasta roko andolan at latur solapur highway
Latur, rasta roko andolan at latur solapur highwaysaam tv

- संदीप भाेसले

Latur News : शेतक-यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज (शुक्रवार) अखिल भारतीय छावा संघटनेने लातूर- सोलापूर महामार्गावरच्या टाका येथे पाटी रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदाेलनात माेठ्या संख्येने शेतकरी देखील सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

Latur, rasta roko andolan at latur solapur highway
NIA Raids In Boisar : दहशतवाद्यांना मदत? एनआयएचा बाेईसरला छापा, तिघे चाैकशीच्या फे-यात

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम विम्याची रक्कम द्यावी, लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या व आदी मागण्यांसाठी आज अखिल भारतीय छावा संघटनेने हे आंदाेलन छेडले.

Latur, rasta roko andolan at latur solapur highway
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' ला उच्च न्यायालयाचा दणका, आजपासून सभासदांना भेटणार : शाैमिका महाडिक (पाहा व्हिडिओ)

येत्या 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्याला दुष्काळ निवारण निधीच विशेष पॅकेज जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य केल्यास 18 सप्टेंबर पासून मराठवाड्यात संघर्षरथ यात्रा (sangharsh rath yatra) काढण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com