Maharashtra water bill controversy : अजित पवारांनी पाण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलंय...दादा नेमकं काय म्हणालेत? अजित पवारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.. पाणी प्रश्न गंभीर होण्यासाठी अजित पवारांनी अजब तर्क दिलाय.. हा तर्क काय आहे पुन्हा ऐका....
राज्यात सध्या पाण्याचा वापर वाढलाय. त्याची कारणं अजित पवारांनी सांगितलेत. मात्र एकीकडे सर्वसामान्यांना अजित पवार उपदेशाचे डोस पाजत असताना मंत्र्यांच्या पाणी वापराकडे साफ दुर्लक्ष करत आहेत..मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं पाणी बील पाहिलं तर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत.... कारण शासकीय बंगल्यांची तब्बल 95 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं समोर आलं होतं.. या मंत्र्यांचा पाणीवापर किती होतो? पाहूयात...
मंत्र्यांच्या बंगल्याची थकित पाणीपट्टी (2021-2023)
एकनाथ शिंदे, तत्कालिन मुख्यमंत्री, (नंदनवन)- 18 लाख 48 हजार
एकनाथ शिंदे, तत्कालिन मुख्यमंत्री (वर्षा बंगला) - 11 लाख 69 हजार
दीपक केसरकर (रामटेक) - 11 लाख 30 हजार
उदय सामंत (मुक्तागिरी) - 6 लाख 83 हजार
सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी) - 6 लाख 52 हजार
डॉ. विजयकुमार गावित (चित्रकुट) -5 लाख 19 हजार
अजित पवार (देवगिरी) - 4 लाख 38 हजार
देवेंद्र फडणवीस (मेघदूत) - २ लाख ७३ हजार
देवेंद्र फडणवीस (सागर) - 1 लाख 26 हजार
गुलाबराव पाटील (जेतवन) -1 लाख 18 हजार
राधाकृष्ण विखे पाटील (रॉयलस्टोन) - 92 हजार
सह्याद्री अतिथीगृह - 35 लाख 99 हजार
मंत्र्यांचे बंगले नेहमीच वादाची आगारं ठरतात,त्यात चहापान,नाष्टा आणि बंगल्याच्या सुशोभिकरणावर होणारी कोटीच्या कोटी उड्डाणे ही ठरलेलीच. त्याची डोळे फिरवणारी आकडेवारी समोर येताच सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळतं...मात्र हेच मंत्री जेव्हा मतदारांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करतात तेंव्हा म्हणावसं वाटतं...अहो मंत्री महोदय दूसरों को बुरा कहने से पहले, अपने गिरेबान में झांक कर देखो तो कोई बात बने।...एवढंच...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.